Ek Sangu By Manjiri Gokhale Joshi Translated By Supriya Vakil
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
समर्पक शब्दांत दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडणारं हे मंजिरी गोखले जोशी यांचं पुस्तक समयोचितदेखील आहे. अभिनेत्री सुश्मिता सेन यांनी प्रास्ताविकात वडील पिढीच्या डोळेझाकीला जमिनीत तोंड खुपसून बसणाNया शहामृगी वृत्तीची उपमा दिली आहे. असहायतेतून आलेली ही शहामृगी वृत्ती कमी करायला हे पुस्तक एखाद्या वाटाड्याप्रमाणे दिशादर्शन करू शकेल, असा मला विश्वास वाटतो. – अरुण टिकेकर संपादक, लेखक यश-अपयश, जराशी मजा आणि मद्यपान करून गाडी चालवणं, निरुपद्रवी शॉर्टकट्स आणि फसवणूक... या साNयातील सीमारेषा किती पुसट असते नाही! स्वप्नांनी भरलेलं भविष्य आणि आवेशपूर्ण तरुण मन, संताप, पळून जाणं, मादक द्रव्यांचं सेवन आणि हिंसाचाराकडे किती चटकन वळतं! आपण मुलांशी फक्त बोललो असतो आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे फक्त त्यांचं ऐवूÂन घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं टीनएजर्सच्या पालकांना कितीदा वाटलं असेल? सगळ्या आईबाबांना आपल्या मुलांना जे सांगावंसं वाटत असतं तेच या पुस्तकात अतिशय खुसखुशीत शैलीत सांगण्यात आलं आहे. – किरण बेदी माजी आयपीएस अधिकारी ही मुलं सोलापूर, औरंगाबाद, मुंबई, पुणे, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड अशा विभिन्न वातावरणात वाढली असूनसुद्धा त्यांची मते फारशी वेगळी नाहीत! हा आगळा उपक्रम आता मराठी वाचकापर्यंत पोचत आहे, ह्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. – दिनकर रायकर संपादक, लोकमत मनात उभारणारी प्रेमभावना, उच्चशिक्षण, व्यवसायाची निवड आणि हाती सतत बाळगलेला सेल फोन! मुलांवर तणाव असतो परीक्षेचा, इतर मुलांसारखं ‘वूÂल’ दिसण्याचा आणि पालकांच्या अपेक्षांचा. असे अनेक प्रश्न कौशल्याने हाताळणारं हे पुस्तक किशोर व युवा अवस्थेत असलेल्या प्रत्येकाने जरूर वाचावं, आणि त्यांचा हा प्रवास कौतुकाने पाहणाNयांनीसुद्धा! – गिरीश कुबेर संपादक, लोकसत्ता