Ek Hoti Waghin एक होती वाघीण by V V Shirwadkar
Ek Hoti Waghin एक होती वाघीण by V V Shirwadkar
एक होती वाघीण वि. वा शिरवाडकर लेखकाने ’एक होती राणी’ या नावाने लिहिलेले नाटक रंगभूमीवर आले ते ’एक होती वाघीण’ या नावाने. मूळ लेखनानंतर ब-याच काळानंतरस हे प्रेक्षक वाचकांसमोर आले. तोवर बरेच संदर्भ बदलेले होते. या नाटकाचा एकाधिकारशाही विरूद्ध जनशक्ती हा संदर्भ महत्त्वाचा आहेच. तरी तोच एक हया नाटकाचा केंद्रबिंदू नव्हे. कला आणि प्रीती यांचे प्रत्येक व्यक्तिच्याच नव्हे तर समाजजीवनातील महत्त्व लेखकाने मनोरंजकरित्या मांडले आहे. हया नाटकाची कथावस्तू शिरवाडकरांच्या प्रतिभेतून निर्माण झालेली आहे हा या नाटकाचा एक विशष. या नाटकात समूहगीत आणि गणगीत यांच्या रूपाने संगीताचा फार वेगळया प्रकारे उपयोग केला आहे. मुंबई मराठी साहित्य संघाने केलेल्या निर्मितीत संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांनी केलेल्या प्रयोगाची हकीकत त्यांनी हया ’शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष’ आवॄत्तीत लिहिली आहे. पहिल्या प्रयोगातील सुनीला प्रधान, अशोक पत्की, रजनी आणि प्रदीप वेलणकर यांचया आठवणीही दिलेल्या आहेत.