Ek Divas Achanak By
या आत्मकथनाचे लेखक समीर भिडे यांच्या आयुष्यात एक दिवस अचानक अत्यंत अकल्पित अशी घटना घडली. त्या घटनेने त्यांचे आयुष्य मुळापासून उन्मळून पडले. लाखात एकाच्या वाट्याला येणाऱ्या पक्षाघाताच्या झटक्याने त्यांचे आयुष्य कायमचे बदलून गेले. कधीही कल्पना केली नव्हती एवढे परावलंबित्व वाट्याला आले, नोकरी गमवावी लागली आणि पाठोपाठ घटस्फोटालाही सामोरे जावे लागले. पण ‘एक दिवस अचानक’ ही त्यांच्या व्याधीची नाही, तर व्याधीतून पुनश्च उभे राहण्यासाठी निकराने दिलेल्या लढ्याची कथा आहे. या लढ्यासाठी त्यांना वेगवेगळ्या समाजांतील मित्रपरिवार आणि मदतनीसांची साथ मिळाली. हे आव्हान पेलताना पाश्चात्य वैद्यक आणि पौर्वात्य स्वास्थ्योपचारांचे साहाय्य लाभले. या प्रवासात समीर यांचा दृष्टिकोन कायम सकारात्मक आणि कृतज्ञ राहिला. त्यातूनच त्यांना वास्तव जसे आहे, तसे स्वीकारण्याचे बळ मिळाले. त्यांची ही कहाणी वाचताना वाचकालाही अकस्मात उद्भवलेल्या संकटाला धीराने सामोरे जाण्याचे बळ लाभेल याची खात्री वाटते.