Payal Books
Dyanamurti gowind talwalkarज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर ---डॉ. निरुपमा व सुषमा गोविंद तळवलकर
Couldn't load pickup availability
आमचे वडील, श्री. गोविंदराव तळवलकर, यांना सिद्धहस्त, अभिजात लेखक, द्रष्टा इतिहासकार, प्रभावी व द्रष्टा संपादक व समाजसुधारक या नात्याने सर्वजण ओळखतात. ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा ।। अशी त्यांच्याबद्दल लोकभावना होती. मराठी पत्रकारितेत टिळकयुगानंतर तळवलकरयुग हे महत्त्वाचे समजले जाते. त्यांनी अग्रलेख, लेख, ग्रंथ यांद्वारे इतिहास, जुने व नवे विचार, साहित्य आणि कल्पना यांची विशाल, जागतिक संदर्भातून वाचकांना ओळख करून दिली, विश्लेषण केले, वेगळी प्रमेये मांडली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रांत वेळोवेळी मार्गदर्शन केले. भ्रष्टाचार व समाजविघातक प्रवृत्तींना पायबंद घालण्याचे कार्य केले.
तथापि त्यांच्या व्यक्तित्त्वाचे अनेकविध पैलू लोकांना माहित नाहीत. लहानपणापासून अखेरपर्यंत बाबांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीच त्यांची वाच्यता केली नाही आणि त्यांचे भांडवलही केले नाही. त्यामुळे लोकांना त्या अडचणींची कल्पनाही नाही. धैर्य, त्याग, सत्यवादी निस्पृहवृत्ती, औदार्य, क्षमाशीलता, सततोद्योग, प्रसिद्धीपराङ्मुखता, अगत्यशीलता, सौजन्य, कुटुंबवत्सलता या त्यांच्या गुणांची आणि काव्यशास्त्रविनोद, चित्रशिल्पकला, संगीत, बागकाम, पशुपक्षी, निसर्ग, पर्यावरण, प्रवास यांच्या अभिरुचीविषयी लोकांना माहिती नाही. हे सर्वांना माहित व्हावे या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.
