द्वापारयुग ८,६४,000 वर्षांचे मानले जाते. वेदांचा काळ सत्ययुगातील रामायण त्रेतायुगात तर महाभारत द्वापारयुगातील मानण्यात येते. द्वापारयुग हा भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाळ असे म्हणता येईल. शेती, पशुपालन, उद्योग, व्यापार यामुळे नागरी संस्कृती निर्माण झाली. अनेक छोटी-छोटी राज्ये निर्माण झाली. राजसत्ता, धर्मसत्ता प्रबळ झाल्याने संघर्ष होऊ लगले, द्वापारयुगात जैन, बौद्ध धर्माचा उदय, भारतात निर्माण झालेली वैभवशाली साम्राज्ये, पाणिनीकृत संस्कृत व्याकरणाची रचना ‘अष्टाध्यायी’, कौटलिय अर्थशास्त्र, सम्राट अशोकाचा धर्मविजय, पतंजलीची योगसूत्रे, चरक, सुश्रुत, वाग्भट यांचे आयुर्वेदाचे ग्रंथ, नार्गाजुनाचा शून्यवाद निर्मितीचा काळ, तर महायान पंथाचा उदय, कालिदास भवभूती भास यांचे संस्कृत साहित्य ह्याच काळातील. भरतमुनींचे नाट्य शास्त्र, संगीत, नृत्यकला, मूर्तिशास्त्र, मंदिरे – लेणी, शिल्पकला ह्याला, लाभलेला हा समृद्ध काळ. वात्सायनाचे कामशास्त्र, अर्थभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य गणित, खगोल संशोधनाचा काळ. ह्या द्वापारयुगात खूपच विषयांची झालेली प्रगती हे. ह्या युगाचे वैशिष्ट. म्हणूनच लेखक द्वापारयुगाला सुवर्णकाळ म्हणतात.
Dwaparyug by Anil shinde
Regular price
Rs. 313.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 313.00
Unit price
per