Skip to product information
1 of 2

Payal Book

Durgayatri: दुर्गयात्री by Sadashiv Tetvilkar

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
दुरून का होईना मी पाहिलेला पहिला किल्ला कोणता असेल तर तो ठाणे किल्ला. वर्षातून एकदा नारळीपौर्णिमेनिमित्त कळव्याच्या पुलावरून खाडीत नारळ टाकण्यासाठी आईचे बोट धरून जाताना ठाणे किल्ला दिसला की मी आईचा हात गच्च धरून भीत भीत किल्ल्याकडे पाहत चालू लागे. त्याला कारणही तसेच होते. पोलीस “डांबिस माणसाला” बेड्या घालून पकडून नेत व या किल्ल्यात कोंडून ठेवत हे मी पाहायचो. माझी भीती अनाठायी नव्हती. मी काही दंगामस्ती केली की वडीलधारी माणसे “पोलीस मामाला बोलावू काय?” अशी मला भीती घालीत, त्यामुळे ठाण्याचा किल्ला म्हणजे दंगेखोरांना डांबून ठेवणारा कैदखाना हा भीतीचा बागुलबुवा बालपण सरेपर्यंत कायम होता. पुढे इतिहास व चरित्रग्रंथ वाचनामुळे तो भ्रम दूर झाला. अलीकडेच ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री. सदाशिव कांबळे यांच्यामुळे ठाणे किल्ला मला आतूनही पाहता आला. “स्वातंत्र्य संग्रामाचे स्मारक” असलेला ठाणे किल्ला ठाणेकरांचा मानबिंदू म्हणून ओळखला जातो.
तीस वर्षांपूर्वी आदरणीय आप्पा तथा कै. गो. नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकांमुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या “शिवतीर्थ रायगड” सह महाराष्ट्रातील सर्व किल्ले पाहण्याची उर्मी मनी बळावू लागली. सह्याद्रीतील गिरिशिखरे खुणावू लागली. गडकोटांशी संगत जमली आणि पायाला भिंगरी लागली. प्रवासासाठी अनेक सखेसोबती भेटले आणि भेटीगणिक एका – एका किल्ल्याची भर पडू लागली. एक दिवसापासून एक आठवड्यापर्यंत गडकिल्ल्यांच्या मोहिमा आखल्या जाऊ लागल्या. भ्रमंती मंडळाचे अध्यक्ष श्री. रवी कांबळे यांनी १९८३ साली मे जूनच्या तळपत्या उन्हात ११०० कि.मी. लांबीची त्र्यंबकेश्वर ते रत्नागिरी सह्याद्री पदभ्रमणाची साहस मोहीम आखली होती. ही दीर्घ मोहीम महिनाभराची होती. तेव्हा रायगड किल्ल्यापासून सुरु झालेली भटकंती अद्याप थांबलेली नाही. आजपावेतो शंभर एक किल्ले प्रत्यक्ष पायी फिरून पाहिल्याचा आनंद वाटतो. रायगडावर छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचा मूर्तिमंत प्रत्यय येऊन आनंदाने जसा उर भरून आला आहे, तसा जगदीश्वरापुढे नतमस्तक होण्यापूर्वीच शिवरायांच्या समाधीसमोर भावविभोर होऊन गडसोबत्यांसह निःशब्दपणे तासनतास बसलो आहे. पावनखिंड, उंबरखिंड आणि नेसरीच्या खिंडीतल्या संग्रामस्थळी जाऊन पराक्रमाची शर्थ करणाऱ्या मावळ्यांच्या तळपत्या तलवारींचा खणखणाट, उसळत्या रक्तांचे पाट आणि भुईवर आदळणाऱ्या कलेवरांचा अंगावर येणारा थरार मनःचक्षूसमोर जागविला आहे. नाणेघाट, तैलबैला घाट, कातुरबाघाट व कावळ्याघाटासारखे सह्याद्रीतील जवळजवळ सर्व ऐतिहासिक घाट पायी चढउतार केले आहेत. दुर्गभ्रमणाबरोबर लेणी, मंदिरशिल्प, चैत्य, गुहा धुंडाळल्या आहेत. भटकंतीत जिद्द, साहसातून मिळणाऱ्या निर्मळ आनंदासोबत अनुभवाच्या शिदोरीने माझी ओंजळ भरू लागली. या ओंजळीचे एक वैशिष्ट्य म्हणजे गेली कित्येक वर्ष ही अनुभवाची शिदोरी मी वाटतो आहे. पण अर्जुनाच्या अक्षय्य भात्यासारखी माझी ओंजळ भरलेलीच आहे. कारण या दुर्गयात्रेत जसा मी आहे, माझे गडसोबती, आप्त, मित्र आहेत तसे वाचकहो, तुम्हीही आहात. आपण सारेचजण शिवप्रेरणेने भारलेले आहोत. फार पुण्यवान आहोत आपण. साऱ्या जगाने हेवा करावा असा महाराष्ट्राचा...
.... माझ्या छंदिष्टपणाला लगाम न घालता माझ्या दुर्गभ्रमणात आनंदाने सहभागी होणारी माझी अर्धांगिनी सौ. विमल व मुले सीमा व विवेक यांची साथसंगत नसती तर ही दुर्गयात्रा करणे शक्यच नव्हते याची जाणीव मला आहे. किंबहुना त्यांच्या सोबतीनेच हा दुर्गम प्रवास सुखकर झाला. हे पुस्तक वाचून कोणाला गडकिल्ल्यांना भेटी द्याव्याश्या वाटल्या तर माझे हे लेखनश्रम सत्कारणी लागले असे मी मानतो त्यामुळे तूर्तास एवढेच....