‘तात्त्विक कलात्मकता’ हे पठारेंच्या कादंबऱ्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही ‘व्यवस्थेतील ‘ पर्यावरण आणि त्यामध्ये निर्माण झालेले ‘प्रदूषण’ पाहण्यात, या व्यवस्थेत वेगवेगळ्या स्तरावर वावरणाऱ्या माणसांची ‘अवस्था’ पाहण्यात, मानवी जगण्याचे ‘सत्ताशास्त्र’ तपासण्यात आणि मानवी जगण्याची ‘रिलेटिविटी’ दाखवण्यात पठारेंची प्रतिभा मन:पूर्वक रमते. त्यांच्या कादंबऱ्यांची संहिता आपण निव्वळ वाच्यार्थाने उलगडत जातो असे न होता ‘आकलनातही ‘ ही ‘ संहिता उलगडत जाते. ही प्रक्रिया अर्थात्च ‘सरळ रेषीय’ असत नाही, पठारेंच्या कादंबऱ्यात एक निश्चित असा ‘मध्यवर्ती बिंदू’ • असत नाही याचे कारण ते परिस्थिती प्रवाही, लवचिक आणि अनिर्बंध मानतात. तात्विक भाषेत ज्याला ‘अंधारात उडी घेणे’ म्हणतात, असे साहस सर्जनशील रुपात करून पठारे मानवी अस्तित्त्वातली ‘काळोखांची अंगे’ ही दाखवतात. वास्तवाचा वेध घेत घेत एका बिंदूला वास्तवाच्या पलीकडे जातात, त्यामुळे त्यांच्या लेखनाला ‘आध्यात्मिक परिमाण’ ही प्राप्त होते. आणि आजच्या जगण्यातले आध्यात्मिक रितेपण अधोरेखित होते.
Payal Books
Dukkhache Shwapad | दु:खाचे श्वापद by Rangnath Pathare | रंगनाथ पठारे
Regular price
Rs. 314.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 314.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
