बालमित्रांनो,
गणिताला घाबरण्याची आता अजिबात गरज नाही; कारण या पुस्तकाच्या मदतीने आपण गणिताचा पाया भक्कम करू शकाल. या पुस्तकातील संकल्पना समजून घेऊन इयत्ता पाचवीसाठी असलेल्या स्कॉलरशिप, नवोदय इ. परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी सहजरीत्या करू शकाल.
ठळक वैशिष्ट्ये –
• गणिताची उकल सांगणारी सोपी तंत्रे, सूत्रे, युक्त्या आणि उदाहरणे
• आकृत्यांसह स्पष्टीकरणे
• बुद्धीला अधिक चालना देणाऱ्या अवघड गणितांचा संग्रह
• सरावासाठी उत्तरांसह गणिते
• विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक
गणिताशी मैत्री करायला लावणारे हे उपयुक्त पुस्तक प्रत्येक विदयार्थ्याच्या संग्रही असायलाच हवे.