Don Yashasvi Lokyudhe |दोन यशस्वी लोकयुद्धे Author: P. D. Patankar | पु. द. पाटणकर
‘‘होय, आम्ही अमेरिकनांविरुद्ध लढण्याची रणनीती आखण्यापूर्वी, शिवाजी महाराजांच्या मोगलांविरुद्ध लढण्याच्या रणनीतीचा प्रथम अभ्यास केला होता. माओनीतीचा पण आढावा घेतला होता. नंतरच अमेरिकनांविरुद्ध लढण्याची रणनीती ठरवली व आम्ही युद्धांत यशस्वी झालो.’’
हो-ची-मिन्ह अध्यक्ष, व्हिएटनाम सरकार व्हिएटनाम युद्ध यशस्वी झाल्यावर, स्थापन झालेल्या व्हिएटनामी सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधींनी जगात प्रथम मान्यता दिली होती. नंतर हो-ची-मिन्ह - व्हिएटनाम अध्यक्ष - दिल्ली भेटीवर आले असताना त्यांनी मोहन धारिया - प्लानिंग कमिशन उपाध्यक्ष - यांच्याशी बोलताना वरील उद्गार काढले होते. मोगल विरुध्द मराठे व फ्रेंच-अमेरिकन विरुध्द व्हिएटनाम या दोन लोकयुद्धांतील साम्यस्थळे व तुलना दाखविण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. ज्या छोट्या राष्ट्रांवर साम्राज्यवादी लोकांची आक्रमणे होतील त्या राष्ट्रांना वरील युद्धनीतीच्या अभ्यासाचा फायदाच होईल.