Dnyaneshwari Swarup Tattvandyan Ani Kavya by M. V. Dhond ज्ञानेश्वरी स्वरूप तत्त्वज्ञान आणि काव्य म. वा. धोंड
Dnyaneshwari Swarup Tattvandyan Ani Kavya by M. V. Dhond ज्ञानेश्वरी स्वरूप तत्त्वज्ञान आणि काव्य म. वा. धोंड
कोणत्याही ग्रंथाचे रहस्य समजून घ्यायचे असेल, तर त्या ग्रंथाविषयीचे आणि ग्रंथकारासंबंधीचेही सर्व पूर्वग्रह विसरूनच तो ग्रंथ वाचायला हवा. ग्रंथ आपल्याशी काही बोलू इच्छितो आणि आपण त्याला मोकळेपणाने बोलू दिले पाहिजे. ग्रंथ आपल्याशी बोलत असताना तो व आपण यांच्यामध्ये तिस-याला येऊ देता कामा नये. तसा कोणी आला; तर ग्रंथाशी आपला जो संवाद व्हायला हवा, त्यात विक्षेप येतो. ज्ञानेश्वरीच्या वाचनाच्या वेळी जे पूर्वग्रह माझ्या वाचनात विक्षेप आणीत होते, ते बाजूला सारल्यावर माझे वाचन अधिक फलदायी ठरले. हे पूर्वग्रह ज्ञानेश्वरीचे स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य यांविषयीचे.