PAYAL BOOKS
Dnyandeva Tethe Samadhi By Dr. Rahul Deshpande ज्ञानदेवा तेथें समाधी डॉ. राहुल देशपांडे
Couldn't load pickup availability
Dnyandeva Tethe Samadhi By Dr. Rahul Deshpande ज्ञानदेवा तेथें समाधी डॉ. राहुल देशपांडे
पैठण नेवासे, त्र्यंबक सोडून । का रे संजीवन, आळंदीत ॥
गोदा प्रवरेचे, सोडूनी किनारे । इंद्रायणी का रे, अंतरात ॥
निघतो माऊली, शोधण्या उत्तरे । पाठीशी तूच रे, प्रवासात ॥
तेराव्या शतकात देवगिरीवर यादवांचा विजयध्वज फडकत होता. पैठण, नेवासे, त्र्यंबक, मंगळवेढा, श्रीपर्वत आणि अर्थात देवगिरी ही स्थाने राजकीय, धार्मिक, याबरोबरच सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. गोदावरी-प्रवराकाठ तत्कालीन महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपत होते. तरीही या सगळ्या स्थानांच्या माहात्म्याकडे पाठ फिरवून संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीसारख्या अतिशय महत्त्वाच्या घटनेसाठी इंद्रायणीकाठी असणारी आळंदी का निवडली असावी?
