Payal Books
Diwali ank Sahitya Chaprak 2025 दिवाळीअंक साहित्य चपराक 2025
Couldn't load pickup availability
Diwali ank Sahitya Chaprak 2025 दिवाळीअंक साहित्य चपराक 2025
साहित्य चपराक दिवाळी अंक २०२५ पूर्वनोंदणी सुरु
साहित्य चपराक’ – दिवाळी अंक २०२५: वाचता, ऐकता येणारा अभिजात मराठीचा जागर
दिवाळी, म्हणजे दिव्यांचा उत्सव! ज्ञानाचा, आनंदाचा आणि सर्जनशीलतेचा उत्सव! या उत्सवात प्रत्येक मराठी मनाला वेध लागतात ते दिवाळी अंकांच्या आगमनाचे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत दिवाळी अंकांना अनमोल स्थान आहे. याच परंपरेला आधुनिकतेची जोड देत ‘साहित्य चपराक’ मासिकाने दिवाळी अंक केवळ वाचण्याचा नव्हे, तर अनुभवण्याचा एक सोहळा बनवला आहे.
वाचकांच्या आग्रहामुळे आणि वाढत्या मागणीमुळे हा अंक मागच्या तीन वर्षांप्रमाणेच मुद्रित (प्रिंट), ई-बुक आणि ध्वनी (ऑडिओ) अशा तिन्ही स्वरूपात उपलब्ध होत आहे. साहित्य अकादमी विजेते तसेच महाराष्ट्राच्या मानाचा तुरा म्हणता येईल असे प्रतिथयश लेखक, पत्रकार, कवी, संपादक, कलाकार यांच्या समृद्ध लेखनाने परिपूर्ण असलेला हा अंक मराठी साहित्य विश्वातला एक मैलाचा दगड ठरणार आहे.
