Payal Books
Dikkalayatriदिक्कालयात्रीसुशील अत्रे
Couldn't load pickup availability
अॅडव्होकेट सुशील अत्रे यांच्या कथा गेली दहा वर्षे सातत्याने धनंजय दिवाळी अंकात प्रसिद्ध होत आहेत. अत्यंत सरळ सोपी भाषा, वर्तमानातील घटनेची इतिहासाशी सांगड घालण्याचे कौशल्य यामुळे वाचक कथानकात गुंतत जातो.
कथेतील पत्रकार असलेला नायक, त्याला येत असलेले अतिंद्रीय अनुभव, त्यानुसार तो घेत असलेला शोध आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटनांची तो आपल्या पद्धतीने घालत असलेली सांगड आपल्याला अधिकाधिक गुंतवून ठेवते, यातील कथा केवळ काल्पनिक असतील अशी शंका सुद्धा वाचकाला येत नाही इतके त्यांनी दिलेले संदर्भ कथेमध्ये चपखल बसलेले असतात. लेखन, वाचन, नाट्य, प्रवास, गिर्यारोहण यांची आवड असलेले सुशील अत्रे उत्तम वाचकही आहेत. त्यांच्याकडील पुस्तकांचा अफाट संग्रह आणि त्याबद्दलचा जिव्हाळा याची साक्ष देत असतात.
वाचक नक्कीच 'दिक्कालयात्री' या कथासंग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत करतील यात शंका नाही.
