Payal Book
Dhyan-Vidnyan by Dr.Yash Velankar
Couldn't load pickup availability
ध्यान या शब्दाचा संदर्भ आपण अध्यात्म, धर्म, उपासना यांच्याशी जोडला आहे. ध्यानधारणा म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी किंवा साक्षात्कारासाठी करायची साधना, असा अर्थ आपण गृहीत धरतो. या पुस्तकामध्ये आपण ध्यानाचा तो अर्थ गृहीत न धरता, त्याचा ऐहिक अंगाने विचार केला आहे. ध्यानाचा शरीर-मनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास गेली चाळीस वर्षे जगाच्या विविध भागात होत आहे. आपण तो अभ्यास, त्यासाठी केले जाणारे संशोधन साध्या-सोप्या भाषेत या पुस्तकामध्ये आहे.एकविसाव्या शतकात मेंदूविज्ञान वेगाने प्रगत होत आहे, त्यामुळे ध्यानाचा मेंदूवर होणारा परिणाम माणसाच्या पेशीवरदेखील होतो आणि त्यामुळे शरीर म्हातारे होण्याची गती कमी करता येते. हे प्राथमिक संशोधनात दिसून आले आहे. ध्यानामुळे मेंदूला काही काळ विश्रांती मिळते आणि त्यामुळे माणसाची निर्णयक्षमता वाढते, प्रतिकूल परिस्थितीतदेखील त्याचा भावनिक तोल ढळत नाही, कामाचा उत्साह कायम राहतो हे प्रत्यक्ष अनुभवल्याने अनेक प्रथितयश उद्योगपती, नेते, सैन्याधिकारी, खेळाडू आपल्या व्यग्र आयुष्यात ध्यानासाठी वेळ काढत आहेत.ध्यान म्हणजे कुठल्यातरी गूढ, अनाकलनीय शक्तीच्या मागे लागणे नव्हे, तर आरोग्यरक्षक असा व्यायाम आहे. म्हणूनच प्रत्येक सुजाण, शहाण्या माणसाने ध्यानासाठी वेळ काढणे आवश्यक आहे.
ध्यान ही प्रक्रिया विज्ञानाच्या कसोटीवर कशी खरी उतरते आहे याची चर्चा या पुस्तकातून वाचायला मिळते.

