वर्तमान जगण्यासह गाव समजून घेताना अधिकच उसवत चाललेला धनू शेळके टाके घालीत पुन्हा पुन्हा स्वतःला शिवत जातो. राजकारण आणि जातकारण याच्यातच अडकून पडलेल्या व सबंध मानवाला दिवाळखोरीत काढू पाहणाऱ्या वर्तमानाला सामोरे जाताना तो अधिकच भयभीत आणि एकाकी बनत जातो. तरीही दुष्काळात सुध्दा ‘तगून राहण्याच्या व उगवून येण्याच्या वृत्तीतून संभ्रमित वर्तमानाला प्रतिक्रिया देताना ‘कॉमन मॅन’च्या आतल्या आवाजाला तो जागे करतो. आणि मग संवादच आटत चाललेल्या आजच्या युगात, संवादाच्या सामर्थ्याने वास्तवाला प्रतिक्रिया देत जाताना त्याची ‘धूळपावलं’ आकारत जातात. ही पावलं ठेचाळतात, रक्ताळतात, मोडून पडताना मात्र बीजारोपण करतात. तुकारामांच्या शब्दांत, ‘कणसासाठी बीजासारखं स्वतःला मातीत गाडून घेण्याची प्रक्रिया’ समजावून घेताना महेंद्र कदम यांची ‘धूळपावलं’ ही कादंबरी जन्म घेते.
Payal Books
Dhulpawala | धूळपावलं by Mahendra Kadam | महेंद्र कदम
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 269.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
