Dhulakhare Itihasachi 3 - Deshachya Bhasha Debarati Bagachi | Translated by Prachi Deshpande धुळाक्षरे इतिहासाची 3 - देशाच्या भाषा देबारती बागची | अनुवाद : प्राची देशपांडे
धुळाक्षरे इतिहासाची 1 : देशाची फाळणी
या पुस्तकात काय वाचाल?
• देशाची फाळणी होते म्हणजे नेमकं काय आणि भारत-पाकिस्तानमध्ये फाळणीमुळे काय घडलं?
• या फाळणीला कोण आणि कसं कारणीभूत ठरलं? हिंदू आणि मुसलमानांमध्ये कधी व कशी जुंपली?
• एकाच देशाचे दोन भाग वेगळे करताना काय राजकारण घडलं? त्या राजकारणामुळे सर्वसामान्य
नागरिकांना काय झळ सोसावी लागली?
• या फाळणीने जयराज, बीथीताई, करीम नासिर यांच्यासारख्या कुटुंबाची ससेहोलपट कशी झाली?
डोळे आणि कान उघडे ठेऊन इतिहास कसा शिकायचा? इतिहासाचे भान असणे म्हणजे काय? पाठ्यपुस्तकांत सांगितलेल्या इतिहासापलीकडचा, सर्वसामान्य लोकांचा इतिहास मुलांनी कसा जाणून घ्यायचा? या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधातून ‘धुळाक्षरे इतिहासाची' या पुस्तकमालेचा जन्म झाला. ‘देशाची फाळणी', ‘देशाचे लोक' आणि ‘देशाच्या भाषा' अशी मूळ बंगाली भाषेतील तीन पुस्तकं या मालिकेत अनुवादित केली आहेत. निराळ्या प्रादेशिक दृष्टीकोनांतून सांगितलेला हा इतिहास मुलांसह सर्वांनाच विविध प्रांतांच्या इतिहासाकडे अधिक आकर्षित करेल आणि इतिहासाबद्दल प्रश्न विचारायला उद्युक्त करेल, अशी आमची आशा आहे.
*-*-*-*-*-*
धुळाक्षरे इतिहासाची 2 - देशाचे लोक
या पुस्तकात काय वाचाल?
• भारत स्वतंत्र झाला आणि प्रजासत्ताक देश बनला, म्हणजे नक्की काय झालं?
• स्वत:च्याच देशात नागरिकत्त्व सिद्ध करण्याची वेळ लोकांवर का आली?
• स्वातंत्र्यापूर्व काळात हक्काचं गाव, घर असणाऱ्यांना स्वातंत्र्यानंतर स्थलांतरीत का व्हावं लागलं?
• भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही भारतीय असं एकदा ठरवल्यानंतर त्यात वेळोवेळी बदल का होत
गेले?
• नागरिकत्त्वाचा नवा कायदा काय आहे? त्याने घुसखोर ठरलेल्या नागरिकांना काय त्रास सहन करावा
लागतोय?
डोळे आणि कान उघडे ठेऊन इतिहास कसा शिकायचा? इतिहासाचे भान असणे म्हणजे काय? पाठ्यपुस्तकांत सांगितलेल्या इतिहासापलीकडचा, सर्वसामान्य लोकांचा इतिहास मुलांनी कसा जाणून घ्यायचा? या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधातून ‘धुळाक्षरे इतिहासाची' या पुस्तकमालेचा जन्म झाला. ‘देशाची फाळणी', ‘देशाचे लोक' आणि ‘देशाच्या भाषा' अशी मूळ बंगाली भाषेतील तीन पुस्तकं या मालिकेत अनुवादित केली आहेत. निराळ्या प्रादेशिक दृष्टीकोनांतून सांगितलेला हा इतिहास मुलांसह सर्वांनाच विविध प्रांतांच्या इतिहासाकडे अधिक आकर्षित करेल आणि इतिहासाबद्दल प्रश्न विचारायला उद्युक्त करेल, अशी आमची आशा आहे.
*-*-*-*-*-*
धुळाक्षरे इतिहासाची 3 - देशाच्या भाषा
या पुस्तकात काय वाचाल?
• विविधतेत एकता जपणाऱ्या भारताची फाळणी धर्मावरून कशी झाली?
• पुढे प्रजासत्ताक भारताचा कारभार सुरळीत पार पाडता यावा म्हणून राज्यांची निर्मिती केली. तेव्हा
भाषा वादाचा विषय कशा ठरल्या?
• एकच बोलीभाषा असूनदेखील पश्चिम बंगाल हे राज्य वेगळं आणि बाङ्लादेश हा देश वेगळा, असं
• कसं घडलं?
• भाषेसाठी एकत्र येणं आणि भाषेमुळेच वेगळं होणं, असं भारतासारख्या देशात का घडत?
• देश तर सर्वांचाच, तरीही काही जण डावलले जातात ते का आणि कसे?