Payal Book
Dharmachya Palikade Dalai Lama
Regular price
Rs. 205.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 205.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
धार्मिक कारणांवरून घडणाऱ्या युद्धांच्या पलीकडे जाण्यासाठी, त्यांनी एक उन्नत नीतिशास्त्रीय विचारसरणी आपल्या परस्परावलंबी विश्वासाठी आखली आहे. या विचारसरणीद्वारे प्रत्येक धर्मास पूर्ण आदर दिला जातो. आपल्या श्रेष्ठ अशा आध्यात्मिक आणि बौद्धिक स्थानावरून दलाई लामा, ज्या मार्गास 'तृतीय मार्ग' असे संबोधतात, त्या मार्गांसाठी सर्वांना कळकळीचे आवाहन करतात. या तृतीय मार्गाच्या माध्यमातून त्यांनी नैतिक आणि आनंदी आयुष्याचा मार्ग दाखवला आहे. तसेच सामंजस्य आणि परस्परांविषयी आदरभाव बाळगणाऱ्या वैश्विक अशा मानवसमूहाची कल्पना मांडली आहे. धर्माच्या पलीकडे... या पुस्तकाद्वारे दलाई लामांचे सारगर्भ चिंतन व्यक्त झाले आहे. ज्या लोकांना अमुक एखाद्या धार्मिक परंपरेचा शिक्का नको आहे; तरीही उत्तम जगाच्या जडणघडणीसाठी आत्मिकदृष्ट्या सुफल अशा जीवनाची अपेक्षा आहे, अशा लोकांनाही या पुस्तकाद्वारे ठोस, मार्गदर्शक तत्त्वे निश्चितपणे गवसतील.

