आधुनिक काळात एखाद्या मराठी पुस्तकाच्या एक लाख प्रती निघाव्यात असे पुस्तक आहे, बाबा भांड यांची बालकादंबरी ‘धर्मा.
‘ १९७९ मध्ये ‘धर्मा’ प्रथम प्रसिद्ध झाली. केवळ अकराशे प्रती. १९९२ मध्ये ‘धर्मा’ची पंधरावी संस्कारित दहा हजार प्रतींची आवृत्ती प्रसिद्ध झाली. केवळ तेरा वर्षांत एक लाख प्रती वाचल्या गेल्यात. बाबा भांड यांच्या या कादंबरिकेला राज्याचा आणि राष्ट्रीय असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत. गुणवत्तेला खपाप्रमाणे मिळालेले हे दुसरे प्रमाणपत्र. जणू मराठी वाचकांनी अभूतपूर्व सन्मानच केला आहे धर्माचा. आजकाल मुलांच्या वाचनाची चिंता व्यक्त केली जाते. ही चिंता व्यर्थ आहे, हे धर्मा कादंबरिका दाखवून देते. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासोबत उत्तम नागरिकत्वाचा संस्कार हे पुस्तक घडविते. सर्वधर्म समभावाची शिकवण देते. आपली सांस्कृतिक शिकवण इथे आहे. आपले मराठीपण जतन करणारा ‘धर्मा’ घराघरात पोचला पाहिजे. मराठीतील मुलांच्या पुस्तकांत ‘धर्मा’ने एक लाख प्रतींचा उच्चांक प्राप्त केला आहे. या उच्चांकाच्या पायरीला पोचणारी अनेक पुस्तके मराठीत प्रसिद्ध होतील, तो बालवाङ्मयाच्या इतिहासातील एक सोन्याचा दिवस ठरेल. तो दिवस दूर नाही याची चाहूल ‘धर्मा’ देत आहे.
– यदुनाथ थत्ते
(साहित्य सूची- १९९२ अंकातून)
Payal Books
Dharma | धर्मा by AUTHOR :- Baba Bhand
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
