DHAG by PERUMAL MURUGAN
DHAG by PERUMAL MURUGAN
सेल्व्हनचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. गृहनिर्माण वसाहतीच्या योजनेखाली त्यांना आपली वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. बालपणी त्याच्या मनात ठसलेलं हिरव्यागार निसर्गाचं चित्र विस्कटून पुसून गेलं. सेल्व्हनला व त्याच्या कुटुंबाला छोट्या जागेत स्थलांतरीत व्हावं लागलं. त्यानंतरच्या काळात त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या नाना प्रसंगांच्या दबावामुळे घरातील वातावरण तापू लागलं. लालसा व मत्सर या घातक वृत्तींनी आयुष्य झाकोळून गेल्यामुळे नशीबाचे फासे उलटे पडू लागले, हे सेल्व्हनला कळून चुकलं. मानवी संबंधांतील गुंतागुंतीचं आणि ताणतणावांचं भेदक चित्रण व विषयातील नाविन्य हे वैशिष्ट्य असणाऱ्या मुरुगन यांची लक्षवेधी कादंबरी. आज सर्वत्र सुरू असलेल्या अथक शहरीकरणामुळे खालावलेल्या जीवनाची व ढासळलेल्या जीवनमूल्यांची वाचकांना तीव्रतेने जाणीव करून देईल.