Payal Books
Devgiriche Yadav by Brahmanand ShriKrishna Deshpande
Couldn't load pickup availability
Devgiriche Yadav by Brahmanand ShriKrishna Deshpande
देवगिरीचे यादव
डॉ. ब्रह्मानंद देशपांडे
मराठवाड्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी लिहिलेले हे पुस्तक आजही देवगिरीच्या यादव घराण्याच्या माहितीचा प्रमुख स्त्रोत आहे. २०८ पानी या पुस्तकात यादव राजवटीतील सर्व प्रमुख राजांची आणि त्यांच्या कारकीर्दीची सविस्तर माहिती दिलेली आहे.
आर्य संस्कृतीचा भारतवर्षात प्रसार होण्यासाठी जे वंश आणि राजवटींनी महत्त्वाचे कार्य केले त्यात यादव वंशाचे नाव प्रामुख्याने घ्यायला लागेल. यादव राजवटीनेच राजपुताना, माळवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दक्ख्खन इत्यादी प्रदेशांत आपले राज्य स्थापन करुन आर्य संस्कृतीचा प्रचार केला.
वेसुगी, भिल्लम, सिंघण, जैतुगी, आमणदेव, रामचंद्रदेव असे अनेक एकापेक्षा एक बलाढ्य राजे यादव ३०० वर्षांच्या राजवटीत होऊन गेले.
या पुस्तकात आत्तापर्यंत यादवांचे मिळालेल्या सर्व शिलालेखांची यादी दिलेली आहे.

