Deserter डेझर्टर by vijay devdhar
गंथर बान्हमान यांच्या 'आय डेझर्टेड रोमेल' या पुस्तकाचा विजय देवधर यांनी केलेला हा अनुवाद आहे.
हे पुस्तक म्हणजे एक अद्भूत साहस कथा आहे. अनेक साहसी घटना आणि थरारक प्रसंगामुळे ते रोमांचकारी
झाले आहे. बान्हमान यांचे स्वानुभव आणि कल्पना यांची बेमालूम सरमिसळ असलेले हे कथानक आहे.
रोमेल २१व्या पँझर डिव्हिजन मधून निसटले. सहारा वाळवंटाचा वालुकामय प्रदेश ओलांडून त्यांना
आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचायचे होते. सुमारे तीन हजार मैलांचा हा खडतर प्रवास गंथर यांनी
सुरु केला. आणि अनेक थरारक प्रसंगाना ते सामोरे गेले. अनेक प्राणघातक संकटे त्यांच्यावर कोसळली.
त्यातूनही ते निसटत गेले. ते कसे हे पुस्तकातच वाचणे योग्य...