Payal Books
DEEP WORK सखोल कार्य - कॅल न्यूपोर्ट अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके
Couldn't load pickup availability
आपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत मौल्यवान कौशल्यांपैकी एक कौशल्य
झपाट्याने दुर्मिळ होत चाललं आहे.
आकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना, चित्त विचलित होऊ न देता
एकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजेच 'सखोल कार्य'. लेखकाच्या 'स्टडी हॅक्स'
या लोकप्रिय ब्लॉगमध्ये सखोल कार्याची मेढ रोवली गेली. सखोल कार्याच्या
अभ्यासातून करत असलेल्या कामात तुम्हीदेखील अधिक चांगलं योगदान द्याल.
अल्पावधीत अधिक यश प्राप्त कराल आणि एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त
केल्याने जे खरं समाधान लाभतं ते अनुभवाल. थोडक्यात, दिवसेंदिवस
अधिकाधिक स्पर्धात्मक होत चाललेल्या आपल्या अर्थव्यवस्थेत सखोल कार्य ही
अलौकिक शक्ती-सुपर पॉवर म्हणता येईल.
इतकं असूनही, आजमितीला एखाद्या विषयाच्या किंवा कामाच्या खोलात
जाण्याची क्षमता आपण हरवून बसलो आहोत; मग त्या खुल्या आणि
गलबलाट असलेल्या ऑफिसमध्ये ज्ञानावर आधारित कार्य करणाऱ्या व्यक्ती
असोत किंवा निर्मितीक्षम व्यक्ती असोत.
ईमेल्स आणि सोशल मीडियाच्या प्रचंड ओघात दिवसांमागून दिवस
घालवतांना त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, जगण्यासाठी
याहून अधिक
चांगला मार्ग असेल.
'डीप वर्क' हे पुस्तक म्हणजे सांस्कृतिक समीक्षा आणि कृतीक्षम सल्ला यांचं
अजब आणि प्रभावशाली मिश्रण आहे. चित्त विचलित करणाऱ्या या जगात एकाग्र
राहून यश प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला त्यातून मार्ग गवसेल.
'तीव्र एकाग्रता जोपासायला शिकवणारा आणि त्वरित कृतीत आणता येण्याजोगा
क्रमबद्ध मार्ग' अॅडम एम. ग्रॅन्ट, 'ओरिजिनल्स'चे लेखक
