Davi Lokshahi Punarbandhani(डावी लोकशाही पुनर्बांधणी) By Marta Harnecker, Vinaya Malati Hari
Davi Lokshahi Punarbandhani(डावी लोकशाही पुनर्बांधणी) By Marta Harnecker, Vinaya Malati Hari
भाषांतराच्या क्रियाशील कृतीची जबाबदारी म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करणे होय. म्हणजे विशाल जनसमुदायाला कर्ते करणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करणे होय. लोकशाहीच्या पुनर्बांधणीसाठी सर्वसामान्यांना जागृत करणे म्हणजे राजकारण होय. भाषांतरकर्त्या मार्ता हार्नेकरांच्या मांडणीशी सहमती दर्शवणाऱ्या आणखी एका गोष्टीवर भर देतात, ती म्हणजे समाजवादाच्या पुनर्मांडणीसाठी आवश्यक असणारी परिस्थिती निर्माण होत आहे. मार्ताच्या समजानुसार भांडवली विकास तिसऱ्या जगातील राष्ट्रांत जसजसा खोलवर जाईल तसतसा अंतर्विरोध अधिक तीव्र होत जाईल. खदखदणारा असंतोष, पक्षापुढील आव्हाने, डाव्या राजकीय संस्कृतीचा आदर, स्त्री-पुरुष समानता व सैद्धान्तिक स्पष्टपणा इत्यादी गोष्टी जनसमुदायाला नव्या विचाराकडे, नव्या मार्गाकडे घेऊन जातील या मार्ता हार्नेकरांचा आशावाद विनया भारताच्या संदर्भात व्यक्त करतात.
– गोपाळ गुरू