“जे वास्तविक जीवनात खरोखरच काही प्राप्त करू इच्छितात, अशा प्रत्येकासाठी हे एक आदर्श पुस्तक आहे …अप्रतिम!”
– नॉर्मन व्हिंसेंट पील
तुमचे कसे काय चालले आहे? साधारणच का?
खूप चांगले नाही? हं ऽऽऽ चाललंय आपलं!
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सेनचा विश्वास आहे की, जर आपण धाडस केले तर जीवनाकडे आम्हाला देण्यासारखे बरेच काही आहे. ‘जिंकण्याचे धाडस करा’ हेच करण्याची योजना प्रस्तुत करते आहे – अशी योजना जी आत्मविश्वास व आत्मसन्मान यांचा विकास करून प्रत्येकाला एका विजेत्याप्रमाणे विचार करायला प्रेरित करते. हा सहज-सोपा कार्यक्रम सर्वांच्या उपयोगी पडू शकतो, मग त्यांचे व्यक्तिगत उद्दिष्ट काहीही असो. जीवनाच्या आव्हानाला स्वीकारून आपल्या भीतीवर ताबा मिळवण्याचे धाडस करा. करा जिंकण्याचे धाडस.
जॅक कॅनफिल्डने व्यक्तिमत्त्वविकासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांनी जगभरात पाच लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी भाषण-सत्रे संचालित केली आहेत. मार्क व्हिक्टर हॅन्सेन एक लोकप्रिय वक्ता आहेत जे राष्ट्रीय (अमेरिका) मीडियावर सतत दिसतात. हे दोघे न्यूयॉर्क टाइम्सची बेस्टसेलर पुस्तके ‘चिकन सूप फॉर द सोल’ आणि ‘अ सेकंड हेल्पिंग ऑफ चिकन सूप फॉर द सोल’चे लेखकदेखील आहेत.