Dalit Kavita Ani Pratima दलित कविता आणि प्रतिमा by Mahendra Bhavare महेंद्र भवरे
Dalit Kavita Ani Pratima दलित कविता आणि प्रतिमा by Mahendra Bhavare महेंद्र भवरे
दलित कवितेने अर्धशतकाचा कालखंड ओलांडला आहे. दलित कविता हा एकूणच साहित्यातील केंद्रवर्ती प्रवाह ठरला आहे. या कवितेची स्वतःची म्हणून काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत. वैचारिक / सामाजिकता, समाजनिष्ठता हा या कवितेचा मूलभूत गुणधर्म आहे. ती चळवळीची कविता असल्यामुळे केवळ चळवळीची गरज म्हणून समाजशास्त्रीय अंगाने या कवितेची सातत्याने चर्चा होत राहिली.
मात्र दलित कवितेचा भाषा, अभिव्यक्ती, प्रतिमा, शैली या विषयांच्या अनुषंगाने क्वचितच अभ्यास झाला आहे. ‘आई” आणि ‘आंबेडकर’ या दोन प्रतिमांच्या अंगाने फुटकळ, लेखरूपात मांडणी झाली असली तरी ती फारच तुरळक आणि वस्तुनिष्ठ नसलेली अशी आहे. एखाद्या कलाप्रकाराने काळाचा मोठा टप्पा पार केल्यानंतर त्या कलाप्रकाराचे प्रवाहीपण टिकून राहण्यासाठी, त्या कलाप्रकाराची कलात्मकता सिद्ध करणे ही काळाची गरज ठरते. या गरजेतूनच सदर ग्रंथ सिद्ध झाला आहे.