PAYAL BOOKS
Dakshinchya Madhyayugin Itihasachi Sadhane Khand 1 te 4 By G H Khare दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने
Couldn't load pickup availability
Dakshinchya Madhyayugin Itihasachi Sadhane Khand 1 te 4 By G H Khare दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने
दक्षिणच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने" (खंड १ ते ४ एकत्र) हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीला आलेला आहे. इ.स. १९३० आणि त्यानंतरच्या काही वर्षांत ग. ह. खरे यांनी संपादित केलेले तीन खंड आणि डॉ. मो. गं. दीक्षित यांनी संपादित केलेला एक खंड, अशा चार खंडांमध्ये हा कोरीव लेखांचा खजिना भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेला होता. मधल्या काळात या चारही खंडांचं एकत्रित रूप डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या प्रदीर्घ प्रस्तावनांसह नव्या अक्षरजुळणीमध्ये प्रकाशित झालेलं होतं. आता मात्र मूळचा चार खंडांचा हा ऐवज फॅक्सिमिले स्वरूपात एका ग्रंथात, संबंधित कोरीव लेखांच्या उपलब्ध रंगीत अथवा कृष्णधवल प्रतिमांसह पुनर्मुद्रित झालेला आहे.

