नेटवर्क हे म्हटले तर रेल्वे रूळांसारखे संक्रमणाचे माध्यम आहे. रेल्वे रूळ हे कधीच स्थानिक बा जागतिक नसतात. ते म्हटले तर सर्वार्थाने स्थानिक असतात आणि त्याच वेळी ते तुम्हाला अनेक ठिकाणी घेऊन जात असल्याने वैश्विकही असतात. आधुनिक नेटवर्कने अशीच स्थानिक आणि वैश्विक यांच्यात संबंध प्रस्थापना करणारी मध्यस्थाची भूमिका निभावलेली आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात भाषा, तंत्रज्ञान यांच्या जोडीने आपण वापरतो त्या मानवेतर वस्तूंनाही तितकेच महत्त्व आहे. संगणक, इंटरनेट मोडेम, मोबाईल, डिजिटल कॅमेरा या तंत्रज्ञानात्मक वस्तूंनी आपल्या दैनंदिन जीवनातील नित्यकर्मापासून माणसा-माणसांतील संबंध जोडण्यापर्यंत सर्व प्रकारचे काम केले आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारांपासून वैचारिक-राजकीय संवाद प्रस्थापित करण्यापर्यंत, फॅशन-डिझाइनपासून अभिरूची संवर्धनापर्यंत सर्व पातळ्यांवर या उपकरणांनी माणसाची सोबत केली आहे. उच्च तंत्रज्ञान, सडपातळ आकार आणि सलभ वापराची रचना असणारे ‘वॉकमन’, ‘मोबाईल फोन’ ही केवळ तांत्रिक उपकरणे रहात नाहीत, त्यांना ‘सांस्कृतिक उपकरण’ म्हणून जीवनव्यवहारात स्थान प्राप्त झालेले आहे. समग्र मानव समाजाची जीवनशैली घडविण्याचे माध्यम म्हणून या वस्तूंना प्रयोजनमूल्य प्राप्त झालेले आहे. यातूनच नवी सायबर संस्कृती आकार घेत आहे. या तंत्रसांस्कृतिक मन्वंतराचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या ग्रंथातून करण्यात आला आहे.
Payal Books
Cyber-Sanskruti | सायबर संस्कृती by AUTHOR :- Ramesh Warkhede
Regular price
Rs. 323.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 323.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
