Payal Book
Corona Vishwayuddhachi Satyakatha कोरोना विश्वयुध्दाची सत्यकथा by Shripadh sabniss
Couldn't load pickup availability
कोरोना काळाने माणसाला काय शिकवले? या पृथ्वीचे आणि तिच्यावरील सृष्टीचे अस्तित्व माणूस आणि निसर्ग यांच्या सुसंवादावर अवलंबून आहे. हा समतोल ढळला, तर माणसाने आतापर्यंत केलेली सगळी प्रगती मातीमोल ठरू शकते! माणसाच्या अस्तित्वावरच घाला येऊ शकतो! पण माणूस खरेच काही शिकला आहे का?या संकटकाळात जगभरातला विसंवाद समोर आला. वर्चस्वासाठी हपापलेले देश आणि नेत्यांनी जगाला तिसर्या विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे केले. कोरोनाकाळाने मानवतेच्या ऱ्हासाचे कटू सत्य उघड केले. दररोज हजारो मृत्यू अनुभवताना प्रगत राष्ट्रांच्या प्रगतीचा ढोल फाटला. लक्षावधी स्थलांतरित मजुरांच्या हजारो कि.मी. पायपिटीने विषमतेच्या भेगा दाखवल्या. धर्म, वर्ण, वंशाच्या भेदाचे तडे ठळक झाले. कोरोना नव्हे, माणूसच माणसाचा काळ असल्याचे अधोरेखित झाले.

