Colonel Navacha Manus |कर्नल नावाचा माणूस Author: Prafulla Joshi |प्रफुल्ल जोशी
प्रत्येकाला लष्कर व लष्करी जीवनाबद्दल विशेष कुतूहल असते. युनिफॉर्ममधील सैनिक वा अधिकारी आपणास परिचित असतो; पण त्याच्यातला माणूस शोधण्याचा आपण प्रयत्न केलेला नसतो. ‘कर्नल नावाचा माणूस’ या प्रस्तुत आत्मकथनात असा माणूस आपणास भेटतो.
युद्धांसंबंधी अनेक पुस्तके-विशेषत: इंग्रजीमध्ये- प्रकाशित झाली आहेत. युद्धांचा अभ्यास, त्यांतील डावपेच, व्यक्तिगत आणि सांघिक पराक्रमाच्या यशोगाथा यांत आल्या आहेत; पण त्यांत लष्करातील माणसाचे जीवन अथवा जगणे अभावानेच प्रतिबिंबित झाले आहे. एकाच व्यक्तीला एअर फोर्समधे पहिली सहा वर्षे व पुढे आर्मीच्या दीर्घकाळ सेवेत वेगवेगळ्या पदावर कार्यरत असताना येणारे विविध स्वरूपांचे अनुभव क्वचितच वाट्याला येतात. ले. कर्नल प्रफुल्ल जोशी यांना सुदैवाने हे अनुभवविश्व प्राप्त झाले; ते येथे त्यांनी सांगितले आहे. आर्मी, आर्मीतला अधिकारी वा सैनिक आणि त्या युनिफॉर्ममधला माणूस - अशा तीन पदरांतून उलगडत गेलेले हे जीवन म्हणजे मराठीतले अशा प्रकारचे पहिलेच लष्करी आत्मकथन होय.