Skip to product information
1 of 2

Payal Books

College To Corporate via Interview कॉलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्ह्यू'

Regular price Rs. 382.00
Regular price Rs. 425.00 Sale price Rs. 382.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

करिअरची सुरुवात होते ती पहिल्या नोकरीतून... आणि या कॉर्पोरेट जगतात प्रवेश करायचा तर पहिली पायरी असते इंटरव्ह्यूची.

  • नोकरीत उमेदवार निवडताना काय बघितलं जातं? बायोडेटामध्ये काय काय लिहावं?
  • मुलाखतीची तयारी कशी करावी? इंटरव्ह्यूमध्ये नेमकं काय विचारलं जातं? कसं वागायचं इंटरव्ह्यूमध्ये?
  • आजवर केलेल्या अभ्यासातलं विचारलं जाईल की अवांतर काही?

याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे.
कॉलेजचे शिक्षण संपवून नव्याने कॉर्पोरेट जगात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाने, नोकरीसाठी, करिअरसाठी स्वतःला कसं तयार करावं, त्यात यशस्वी कसं व्हावं यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक म्हणजे 'कॉलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्ह्यू'

लेखकाविषयी :
विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव ह्या क्षेत्रात आहे. मोठमोठया भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केलेले आहे.
ते सध्या एपी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपमध्ये ग्रुप डायरेक्टर-एचआर म्हणून काम करत आहेत.
विनोद बिडवाईक हे मानव संसाधन, मनुष्यबळ विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. भारतीय आणि बहुराष्ट्रीय संस्थेमध्ये उच्चपदावर काम करण्याचा तब्बल २५ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते ए पी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपचे पीपल आणि कल्चर विभागाचे समूह संचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते अल्फा लावलमध्ये उपाध्यक्ष – एच आर, तसेच त्यांनी डि एसएम इंडियामध्ये संचालक – एच आर म्हणून काम पहिले आहे. त्यांनी महिंद्रा & महिंद्रा, सेम्पेरिट ग्रुप, इंडियन स्टीलमध्ये अनेक पदावर काम केलेले आहे. ह्या सर्व संस्थांमध्ये ते व्यवस्थापन मंडळाचे सभासद राहिलेले आहेत.
मनुष्यबळ विकास, मानव संसाधन, बिजिनेस स्ट्रॅटेजी, टॅलेंट मॅनेजमेंट, संस्थेची पुनर्रचना, एच आर परिवर्तन, नेतृत्व विकास यासारख्या जटिल विषयावर त्यांनी काम केलेले आहे. त्यांची आतापर्यंत ३ मराठी आणि ४ इंग्रजी पुस्तके लिहिलेली आहेत.
व्यवस्थापन जर्नल्स आणि मासिकांमध्ये ते नियमितपणे लिहितात. ते बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन, एनआयपीएम आणि एनएचआरडीचे आजीवन सदस्य आणि वेगवेगळ्या मंचांवर नियमित वक्तेआहेत. ते इंग्रजी आणि मराठी दैनिके आणि मासिकांमध्ये नियमित स्तंभलेखकही आहेत.