Circle Chi Vartule By Sulakshana Mahajan
पदवी अभियांत्रिकीची, अभ्यास गणितातील पीएच.डी.साठी आणि लक्ष स्वातंत्र्यचळवळीवर. अशा तिठ्यावर उभा असलेला एक अवलिया योगायोगाने चक्क ‘सर्कल’ या चित्रपटगृहाचा मालक बनतो. ...आणि सुरू होते उद्यमशीलतेची, प्रयोगशीलतेची अखंड मालिका. त्याला जोड मिळते या अवलियाच्या स्वभावातील अदम्य ज्ञानलालसेची, कुतुहलाची आणि विज्ञानप्रेमाची. उपजत बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण, सेवादलाच्या संस्कारातून मिळालेली सचोटी, व्यवहारकुशलता आणि समृद्धीचा वापर समाजासाठी करण्याचे औदार्य.... दुर्मीळ गुणांचे वरदान लाभलेल्या रावसाहेब ओकांनी एका ‘सर्कल’ सिनेमातून आलेल्या समृद्धीतून नासिक शहरात अनेक औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वर्तुळे निर्माण केली आणि या शहरास सर्वार्थाने समृद्ध केले. त्यांच्या उद्यमशील जीवनाची ही कहाणी. जेवढी अचंबित करणारी, तेवढीच उत्साहवर्धक, रोचक आणि रंजक.