Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Choosing Gold By Saurabh Gadgi चूझिंग गोल्ड

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Choosing Gold By Saurabh Gadgi चूझिंग गोल्ड

कुटुंब, व्यवसाय आणि स्वतःची ओळखच पणाला लागते, तेव्हा तुम्ही नेमकं काय घट्ट धरून ठेवता ?

‘चूझिंग गोल्ड’ ही केवळ एका प्रदीर्घ वारसा लाभलेल्या ज्वेलरी ब्रँडच्या अस्तित्वाची गोष्ट नाही. एका ठाम संकल्पातून आकाराला आलेली, संकटांच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेली आणि आपल्या मापदंडांशी कधीही तडजोड न करणारी ही अस्सल कहाणी आहे. झटपट सावरण्याचे सोपे मार्ग समोर असतानाही, कठीण वाट निवडण्याची, आपल्या मूल्यांशी एकनिष्ठ राहण्याची, प्रत्येक निर्णयातून पुन्हा विश्वास निर्माण करण्याची आणि व्यवसायाचा गाभा न गमावता प्रगती साधण्याची ही कहाणी आहे. कुटुंबातील विभागणी आणि लागोपाठच्या संकटांना तोंड देत असतानाही, उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन व्यवसायाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या प्रवासाचा हा मागोवा आहे. दृढ निश्चय, विश्वास आणि दूरदृष्टीच्या बळावर काळाच्या कसोटीवर टिकणाऱ्या संस्था कशा उभ्या राहतात, याचा जिवंत प्रत्यय या वारशाच्या सहाव्या पिढीतील विश्वस्त सौरभ गाडगीळ यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून येतो.

ही कहाणी आहे ‘पीएनजी ज्वेलर्स’ची… आणि जे टिकून राहतं, त्याची निवड करण्याची !