Chitrakar Gopal Deuskar Kalavant Aani Manus By Suhas Bahulkar
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
per
चित्रकार गोपाळ देऊसकर ही कहाणी आहे त्यांच्या चित्रनिर्मितीची. बालपणीच त्यांच्यातले चित्रगुण प्रकटले. उत्तरोत्तर ते बहरत गेले. या कलेच्या जोरावर ते इंग्लंडला जाऊन रॉयल अॅकॅडमीत शिकले. भारतीय संस्थानिकांच्या राजवाडयातून वावरले. पुण्याच्या 'टिळक स्मारक मंदिरा'तील लोकमान्य टिळक जीवनदर्शन आणि 'बालगंधर्व रंगमंदिरा'तील बालगंधर्व त्यांच्या कुंचल्यातून साकार झाले. त्यांच्या कॅनव्हासवर कोटयवधींचे दागिने ल्यालेली राणी उमटली, तशीच दूध विकणारी खेडूत स्त्रीही! अशी त्यांची कित्येक चित्रे! ही कहाणी आहे देऊसकरांच्या व्यक्तिगत जीवनाची. लहानपणीच आईवडलांचे छत्र हरपले. त्यांचे जीवन एकाकी तरीही रंगीन, अफलातून तरीही काटेकोर हिशोबी! त्यांनी हौशीने संसार उभारला आणि व्यवहारीपणे तो तोडलाही! ते जगले जन्मभर चित्रकलेच्या साथसंगतीतच! स्वत:च्याच मस्तीत! सुप्रसिध्द चित्रकार सुहास बहुळकर यांच्या शब्दांतून रंगलेले हे देऊसकर दर्शन.