Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Chin Bhetitil Bhashane by Ravindranath Tagore चीन भेटीतील भाषणे

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Chin Bhetitil Bhashane by Ravindranath Tagore चीन भेटीतील भाषणे 

चीन भेटीतील भाषणे हे पुस्तक एप्रिल-मे 1924 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी केलेल्या ऐतिहासिक चीन दौऱ्यावर आधारित आहे. त्या 50 दिवसांच्या दौऱ्यात टागोरांनी विविध ठिकाणी इंग्रजीतून दिलेल्या सात महत्त्वपूर्ण भाषणांचा संग्रह 1925 मध्ये 'Talks in China' या नावाने प्रकाशित झाला होता. या मराठी अनुवादात त्या संपूर्ण पुस्तकाचा समावेश असून, चीनला टागोरांना आमंत्रण देणारे लियांग छिछाव यांनी लिहिलेला 'भारताने चीनला काय दिले?' हा महत्त्वाचा लेखही यात आहे. विशेष म्हणजे, टागोरांच्या त्या भेटीला चीनमध्ये स्थानिक पातळीवर विरोधही झाला होता — 'टागोर, गो बॅक' अशा घोषणाही दिल्या गेल्या होत्या. त्या वादाचा सर्वांगीण आढावा घेणारा अनुवादिका सानिया कर्णिक यांनी लिहिलेला विशेष लेखही या पुस्तकात समाविष्ट आहे. शंभर वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक भेट इतक्या समग्रपणे मराठीत प्रथमच मांडण्यात आली आहे.