Payal Books
Chiku Piku 2024 Sangitmay संगीतमय चिकूपिकू सुट्टीविषेशांक २०२४
Couldn't load pickup availability
चला, सुट्टीची तयारी करू या!
उन्हाळा वाढतोय तशी सुट्टीत काय करायचं याची काळजी पण वाढतेय का? दुपारच्या वेळी मुलांना घरी बसून करता येतील अशा चिक्कार गोष्टी चिकूपिकूच्या सुट्टी अंकात आहेत. गोष्टी ऐकत, गाणी म्हणत, कोडी सोडवत, चित्र काढत, खेळ खेळत ही सुट्टी मजेत घालवता येईल. चिकूपिकूला सोबत घेऊन रोज थोडा थोडा वेळ आईबाबांनीही मुलांबरोबर घालवला की मुलांच्या सुट्टीच्या आठवणी आंब्यासारख्याच गोड होतील.
या वेळचा अंकाचा विषय आहे .. संगीत!
वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी संगीताची जादू आपण या अंकात अनुभवणार आहोत. भारतीय शास्त्रीय संगीतामधले सात स्वर, प्रसिद्ध गायक आणि वादक यांच्या गोष्टी अंकात आहेत. काही वाद्ये कशी तयार झाली याचे गंमतशीर किस्से आणि वेगवेगळ्या भाषांमधली गाणी आहेत. अगदी सोपे आवाजांचे प्रयोग कसे करून बघता येतील ते दिले आहेत. शिवाय अंकात भरपूर QR कोड्स/लिंक्स दिलेल्या आहेत. ते ऑडिओ/व्हिडिओ आवर्जून मुलांबरोबर बघा. हा नक्कीच सुयोग्य स्क्रीनटाईम होऊ शकेल. मुलांना नव्या गोष्टी कळतील, प्रश्न पडतील, कल्पना सुचतील.
