Skip to product information
1 of 2

Payal Books

Chhavani By Anjani Naravane

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
२६ जानेवारी, २००१. भुज. आई-वडिलांचं छत्र नसलेला एक तरुण थोरल्या भावाच्या आणि वहिनीच्या वागण्याने उद्ध्वस्त झालेलं मन सावरायला मित्राकडे जातो, आणि तो बसमधून उतरत असतानाच प्रचंड मोठा भूकंप होतो –दीड मिनिट – हजारो निरपराध जिवांचे मरण... अनेक स्वप्नं उराशी बाळगून कष्टानं उभी केलेली घरकुलं क्षणार्धात जमीनदोस्त... कुणाचे पोटचे गोळे जमिनीत गाडले गेले; कुणाचे जीवनसाथी, कुणाची तरणीताठी मुलं, तर कोणाचं छत्र! भक्कम वाटलेला आसरा जातो, आपली वाटणारी माणसंही जातात, तेव्हा माणसं कशी वागतात; त्यातून सावरताना, गुण-दोषांसकट त्यांचे मूळ स्वभाव कसे वर येतात; त्यातून मनुष्यस्वभावाचे वेगवेगळे पैलू कसे दिसू लागतात; यांचे प्रत्ययकारी चित्रण म्हणजे ही कादंबरी. कुणीच ‘आपलं’ न राहिलेल्या, सर्वस्व गमावून बसलेल्या माणसांची ही कथा मानवी स्वभाव व मानवी अस्तित्व यांबद्दल भाष्य करते, नवी दृष्टी देते.