Payal Books
Chhatrapati Shivaji By Setumadhavrao Pagdi
Couldn't load pickup availability
Chhatrapati Shivaji By Setumadhavrao Pagdi
भारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक ध्येय ठेवले. ह्या ध्येयासाठी लढणे Q आणि प्राणत्याग करणेही कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली; असे स्वराज्य की ज्यामधील सारे वातावरण न्याय, नीती आणि सहिष्णुता यांनी भरलेले होते. ते खऱ्या अर्थाने कल्याणकारी, उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष असे राजे होते. ते स्वराज्याच्या संरक्षणासाठी लढले. त्यांचा लढा असहिष्णुता, अन्याय, आणि वांशिक दुरभिमानाविरुद्ध होता. त्यांचे उदाहरण पाहून रजपूत, बुंदेले आणि इतर, यांना त्यांचे अनुकरण करण्याची स्फूर्ती मिळाली. काही काळातच महाराजांनी चालविलेल्या या उठावाला भारतव्यापी संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले.
सर्व धर्माशी त्यांची वागणूक सहिष्णुतेची आणि उदारपणाची होती. त्या वृत्तींचा त्यांनी प्रचार केला. इतकेच नव्हे तर त्या त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणल्या. शिवाजीमहाराजांचे व्यक्तित्व आणि त्यांचा संदेश यांची गतकाळात जेवढी गरज होती तेवढीच ती आजही आहे.
