‘भोजन म्हणजेच जेवण, हे सर्व प्रकारच्या चवींचे मिश्रण असले पाहिजे. त्यात गोड, खारट, आंबट, तिखट, कडू इत्यादी सर्व प्रकारचे पदार्थ मोडतात, तर जेवणाचा शेवट हा गोड असावा म्हणजेच गोड पदार्थ जेवणात समाविष्ट नसल्यास ते परिपूर्ण जेवण मानले जात नाही. म्हणून गोडाला किंंवा गोड पदार्थाला जेवणात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर या पुस्तकात आपण मिष्टान्नाबाबत म्हणजेच मिठाईबाबत थोडी चर्चा करू या’
सुप्रसिद्ध शेफ आणि 27 वर्षांहून अधिक काळ खाद्यव्यवसायामध्ये कार्यरत आहेत. विष्णू मनोहर यांनी 3000 हून अधिक लाईव्ह कुकरी शोज् केलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी 6 लाखाहून अधिक महिलांना खाद्यपदार्थांचे ट्रेनिंग दिले आहे. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी कुकरी शोज् केले आहेत. त्यांनी केलेल्या पाच ङ्गूट रूंद आणि पाच फूट लांब तसेच 45 किलो वजनाच्या पराठ्याची लिम्का रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अनेक ङ्गेस्टिव्हलचे आयोजन करून ते खवय्यांना सातत्याने नवनवीन रेसिपीज् देतात आणि त्यांना मोहित करतात. गेल्या 11 वर्षांमध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील ‘मेजवानी परिपूर्ण किचन’च्या 3000 कार्यक्रमाद्वारे ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचले आहेत. त्यांच्या या कार्याची व अनुभवाची दखल केंद्र शासनानेही घेतली असून त्यांची ‘भारतीय खाद्य निगम’च्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.