Skip to product information
1 of 2

Payal Books

Charitra- Chintak D. N. Gokhale |चरित्र-चिंतक द. न. गोखले Author: Dr. Jayant Vashta | डॉ. जयंत वष्ट

Regular price Rs. 88.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 88.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publicatios

आधुनिक मराठी साहित्यात चरित्रलेखनाची सव्वाशे-दीडशे वर्षांची व सतत विकसनशील अशी परंपरा आहे.

डॉ. द. न. गोखले यांनी या परंपरेचा ‘व्यक्तिविमर्श’ हा नवा टप्पा आपल्या चरित्रलेखनातून गाठला आहे. या पुस्तकात डॉ. जयंत वष्ट यांनी डॉ. गोखले यांच्या एकूण चरित्रलेखनाचा परिचय करून देऊन त्याचा परामर्श घेतला आहे. डॉ. गोखले हा त्यांच्या दीर्घकाल चिंतनाचा, शोधाचा विषय आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच डॉ. गोखले यांचा महत्त्वाचा भाग आहे. या आत्मीयतेबरोबरच समीक्षक-अभ्यासकाची दृष्टीही त्यांच्यापाशी स्वभावत:च असल्याने या पुस्तकास ‘गौरवग्रंथा’चे स्वरूप आलेले नाही.

चरित्रकार गोखले यांच्या इतर क्षेत्रांतील कार्याचा योग्य विमर्श डॉण् वष्ट यांनी या पुस्तकात घेतला आहे व त्यांच्या साहित्यिक-शैक्षणिक कर्तृत्वाबरोबरच व्यक्तिजीवनाचाही आटोपशीर व नेमका परिचय त्यांनी करून दिला आहे. व्यक्तिदर्शन व परामर्श यांचा हा एक वेगळा, नव्या वाटेने जाणारा मन:पूर्वक प्रयत्न आहे.