दुष्काळपीडित शेतकरी आपल्या बैलासह तालुक्याच्या वाटेला लागले. वाटेवरचे लोक कुतूहलानं या बैलांकडं बघू लागले. त्यांच्या शिंगांसमोर बांधलेल्या पाट्या वाचू लागले. या पाट्या म्हणजे जणू त्या मुक्या प्राण्यांची मनं होती. ती मनं आक्रंदत होती. मागणी करीत होती. “आम्हाला चारा द्या. आम्हाला पाणी द्या.” “आम्हाला खाऊ नका. आम्हाला खाऊ घाला.” “चारा जमवा, आम्हाला जगवा.” “आम्ही जगलो तरच शेतकरी जगंल” बैलांच्या पावलांची गती वाढत होती. त्यांच्या पावलामुळं वाटेवरची धूळ उडत होती. समोरच्या वाटेनं वादळ झेपावत येत होतं.
चारापाणी : दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गुराढोरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नांचा वेध घेणारी कादंबरी.