Chandrachi Savali By Narayan Dharap
संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून घेऊन तो खडक उतरू लागला . रात्रीचा एक पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या जवळून गेला . त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं . घाम फुटून तो खाली वाकला आणि शहारला … तिचे डोळे उघडे होते . त्यात आता बुबुळं नव्हती चंद्रप्रकाशात ते चकचकत होते . धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली . नंतर अवाढव्य अशा ‘ छतारीया इस्टेटचा पिच्छा बुबुळं नसलेल्या तिच्या शरीराने सोडला का ? अघटित आणि अतर्क्य गोष्टींचा भयानक खेळ चंद्राची सावली ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !