Skip to product information
1 of 2

Payal Books

Chaitrapalavi by Chaitrali Terwadkar-Kulkarni

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

होममेकर असलेल्या चैत्राली तेरवाडकर- कुलकर्णी यांना लिखाण-वाचनाची आवड असून, ‘चैत्रपालवी’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहात त्यांनी आयुष्यात जे अनुभव घेतले, त्यांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण तेरा विभाग आहेत. त्यात पंचमहाभूते, नातेसंबंध, निसर्ग, भाषा, समाज, खाद्यसंस्कृती, भावनात्मक, उपदेशात्मक, व्यक्तिविशेष अशा विविध विषयांवरील कविता आहेत. चैत्राली यांची शैली ही साधी आणि सहज आहे. त्यांच्या कवितेत एक ओघवतेपणा आणि साधेपणा आहे जो त्यांच्या जडणघडणीतून आलेला दिसून येतो. या काव्यसंग्रहात इंग्रजी आणि हिन्दी कवितांचाही समावेश त्यांनी केलेला आहे. काव्यसंग्रहाच्या नावाप्रमाणेच मनामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या या कविता वाचकांना नक्कीच आनंद देणाऱ्या आहेत यात शंका नाही. 

कवयित्रीविषयी :

कवयित्री चैत्राली या सध्या पुणे येथे राहत असून त्या होममेकर अर्थात गृहिणी आहेत. त्यांना काव्यलेखनाची विशेष गोडी आहे. कवितेतून त्यांना सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू मांडायला आवडतात. ज्या विषयांवर कमी बोललं जातं अशा विषयांवर लिहायला त्यांना जास्त आवडते. त्यांनी गांधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीताच्या आणि नृत्याचा देखील अभ्यास केला आहे.