Bullets over Bombay बुलेट्स ओव्हर बॉम्बे by Akshay shelar
भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एका उत्कृष्ट निर्मितीविषयीचे भारावून टाकणारे तपशीलवार पुस्तक
'बुलेट्स ओव्हर बॉम्बे'
१९९८ मध्ये जाणकारांचे प्रचंड कौतुक मिळवत 'सत्या'ची धडाकेबाज सुरूवात झाली. राम गोपाल वर्मानं मुंबईतल्या गँगस्टर्सचं रोजचं जगणं पडद्यावर आणण्याचं धाडस दाखवलं; तेही अशा काळात जेव्हा बॉलिवूडचे चित्रपट प्रेमकथांची वेगवेगळी रुपं शोधण्यातच गुंतलेले होते.
'सत्या'मुळे हिंदी गँगस्टरपटांची एक नवी लाट निर्माण झाली. या नव्या बाजाच्या चित्रपटांनी मुंबईची जीवनावश्यक नि राकट बाजू चितारली; जी त्यापूर्वीच्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये क्वचितच दिसायची.
आता दोन दशकांहून अधिक काळानंतर हा चित्रपट आयकॉनिक बनला आहे. चित्रपट आला तेव्हा नेहमी चित्रपट पाहणाऱ्यालाही त्यातल्या मोजक्या लोकांहून अधिक लोक ओळखता आले नसते. आता चित्रपटाची श्रेयनामावली एखाद्या सन्मान पत्राहून कमी नाही - अनुराग कश्यप, मनोज बाजपेयी, विशाल भारद्वाज, सौरभ शुक्ला...
'सत्या हा मैलाचा चित्रपट बनवणाऱ्या कलाकारांशी बोलून एक अविश्वसनीय गोष्ट उदय भाटियानं या पुस्तकाच्या रुपात समोर मांडलीय. यातून चित्रपट बनवत असताना सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या? गँगस्टरपट आणि शहराविषयीच्या चित्रपटांच्या समृद्ध इतिहासापासून कशी प्रेरणा मिळवली? हा चित्रपट मॉर्डर्न क्लासिक कसा बनला? या प्रश्नांची मजेशीर उकल होतानाही दिसते.
पुस्तक : बुलेट्स ओव्हर बॉम्बे
लेखक : उदय भाटिया
अनुवाद : अक्षय शेलार
पाने - 212