Skip to product information
1 of 2

Payal Books

Budhan Sangtoy | बुधन सांगतोय Author: Dakshin Bajrange Chara|दक्षिण बजरंगे छारा

Regular price Rs. 196.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 196.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

हे पुस्तक मी इच्छा नसतानाही लिहिलंय. या लेखनामुळे माझ्या जीवनातल्या अशा काही घटनांचा इथे उच्चार झालाय, ज्यांची आठवणही मला नको वाटते. परंतु डॉ. गणेश देवी यांनी मला हे लिहायला उद्युक्त केलं, आणि त्यामुळे हे पुस्तक तुमच्यासमोर आलंय.
नाट्यकलेमुळे माझ्या जन्मजात गुन्हेगार समाजामध्ये जे परिवर्तन आलं; माझ्या सहकार्‍यांनी पूर्वायुष्य विसरून स्वप्नं पाहणं सुरू केलं, ते सर्व इथे शब्दबद्ध झालंय.
हे केवळ आत्मकथन नसून माझ्या संपूर्ण समाजाचीच ही कहाणी आहे. कदाचित त्यामुळे मी माझ्या समाजाचा अपराधी ठरण्याची शक्यता आहे. तरीही या कथनामुळे, माझ्या नाट्यकलेमुळे जर काही सकारात्मक बदल घडून आले तर परिणाम भोगण्याची तयारी आहे.
- दक्षिण बजरंगे छारा

प्रस्तुत पुस्तकाचे लेखक - नाट्यकलावंत, दिग्दर्शक आणि माहितीपटाचे निर्माते आहेत. गेली बारा वर्षे ते छारा समाज नाटक मंडळीच्या ‘बूधन थिएटर’चे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर भटक्या, विमुक्त जातीजमातींच्या हक्क आणि आत्मसन्मानासाठी ते काम करतात. मदारी समाजावर आधारित ‘फाईव्ह फॉर सर्व्हायवल’ या चित्रपटासाठी त्यांना ‘दक्षिण आशियाई जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.