Budhabhushan (बुधभूषण) By Dr. Prabhakar Takavale
छत्रपती संभाजी महाराजांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारलेल्या बुधभूषण ह्या संस्कृत ग्रंथाचे संस्कृतसह मराठी अनुवादाचे संपादन व प्रकाशन करायला मिळणे ही मोठी संधी आम्हांस लाभली. छत्रपती संभाजी महाराजांवर इतिहासकार, संशोधक, लेखक, साहित्यिक, नाटककार इ. जाणकार समजल्या जाणा-या व्यक्टींनी त्यांच्यावर आजप्र्यंत हा राजा व्यसनी, विलासी, विवेकशून्य, दुराचारी, राज्य बुडवा राजा अशा शब्दात आरोप केले. पण या गोष्टींना कोणताही ऎतिहासिक आधार नाही. छत्रपती संभाजीराजांचा लेखनाचा वारसा समाजापुढे येण्यासाठी आपण त्यांचे वारस म्हणून काही नैतिक व सामाजिक जबाबदारी आप्ण स्वीकारली पाहिजे, केवळ या प्रामाणि हेतूने आम्ही ही संपादन व प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली.---शैलजा मोळक