Budha At Work By Geetanjali Pandit Translated By Dr. Vrunda Chapekar
आपण आपल्या कामाच्या ठिकाणी समाधानी, आनंदी असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याचबरोबर आपल्या कामातून आपली वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. आपलं कौतुक झालं पाहिजे. कामाच्या ठिकाणी आपल्याला आदराची वागणूक मिळाली पाहिजे, असंही आपणाला वाटतं. परंतु आपल्या या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण असमाधानी, निराश आणि दु:खी होतो. मग कामातला आणि मनातलाही तणाव वाढत जातो. परिणामी आपण अपयशाचे धनी ठरतो.हे टाळण्यासाठी गौतम बुद्धांच्या काही तत्त्वांचा अंगीकार केला, ती तत्त्वे आपल्या कामात उपयोगात आणली, तर ‘आनंदयुक्त काम आणि तणावमुक्त जीवन’ याचा अनुभव आपण घेऊ शकतो.कसा? ते गीतांजली पंडित यांचं हे पुस्तक आपल्याला समजावून सांगतं. आपल्या आयुष्याकडे आणि करिअरकडे गुणात्मक नजरेनं कसं बघावं हे शिकण्यासाठी ‘बुद्धा ऍट वर्क’ याचं पारायण करावं असं हे पुस्तक आहे.
बुद्धा अॅट वर्क
Budha At Work
गीतांजली पंडित
Geetanjali Pandit
अनुवाद : डॉ. वृंदा चापेकर
Translation- Dr. vrunda Chapekar