{"product_id":"breakout-trading-made-easy-marathi-by-sunil-gurjar-poonam-chhatre-ब्रेकआउट-ट्रेडिंग-मेड-इझी","title":"Breakout Trading Made Easy (Marathi) By Sunil Gurjar , Poonam Chhatre ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eBreakout Trading Made Easy (Marathi) By Sunil Gurjar , Poonam Chhatre ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eशिकण्यासाठी सोप्या असलेल्या ब्रेकआउट ट्रेडिंगच्या तंत्रांच्या आधारे स्टॉक मार्केटमध्ये अधिक यश मिळवा!\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eलोकप्रिय लेखक सुनील गुर्जर यांच्या ‘ब्रेकआउट ट्रेडिंग मेड इझी’ पुस्तकाच्या साहाय्याने ट्रेडिंगच्या यशस्वी प्रवासासाठी तयार व्हा. ट्रेडिंगच्या धोरणांमध्ये चार्ट पॅटन्सर् किती महत्त्वाचे असतात, हे गुर्जर यांनी स्वतःच्या ट्रेडिंग अनुभवांच्या आधारे या पुस्तकात सांगितले आहे. या तंत्रांच्या मदतीने त्यांनी स्वतःच्या भांडवलात अनेकपट वाढ केली; तसेच बाजारातील मंदीच्या किंवा सतत चढउतारांच्या काळात स्वतःचे संरक्षणही केले.\u003cbr\u003eब्रेकआउट ट्रेडिंगचे अनेक महत्त्वाचे पैलू या पुस्तकातून जाणून घेता येतात. सपोर्ट आणि रेझिस्टन्स् हे गुर्जर यांच्या धोरणाचे प्रमुख आधार आहेत. कँडलस्टिक चार्टस् आणि प्रत्यक्ष उदाहरणांच्या साहाय्याने त्यांनी योग्य ब्रेकआउट कसा शोधायचा आणि खोटा ब्रेकआउट कसा ओळखायचा, हे सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.\u003cbr\u003eब्रेकआउट ट्रेडिंगची समग्र माहिती देणारे हे पुस्तक किमतीचे योग्य उद्दिष्ट ठरवणे, धोरणात्मक स्टॉप-लॉस लावणे, जोखीम व्यवस्थापन करणे आणि जास्तीतजास्त फायदा मिळवणे यांसारखी महत्त्वाची कौशल्ये शिकवते. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या या तंत्रांमुळे तुम्हाला स्टॉक्स्चे व्यवहार करताना आत्मविश्वासाने आणि संपूर्ण माहितीच्या आधारे निर्णय घेता येतील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eतुमच्या ट्रेडिंग प्रवासाचा कायापालट करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? सुनील गुर्जर (CFTe, CMT) हे ‘मेक मनी विथ प्राइस अॅक्शन ट्रेडिंग’ या राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. मुंबईतील वित्तीय शिक्षण आणि सेवा देणार्या ‘चार्टमोजो’ या संस्थेचे ते संस्थापक आहेत. ते पूर्णवेळ शेअर बाजारात ट्रेडिंग करतात आणि चार्ट विश्लेषणातील तज्ज्ञ आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50690984444097,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Breakout_Trading_Made_Easy_Marathi_By_Sunil_Gurjar_Poonam_Chhatre.jpg?v=1791272160","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/breakout-trading-made-easy-marathi-by-sunil-gurjar-poonam-chhatre-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%86%e0%a4%89%e0%a4%9f-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a1-%e0%a4%87%e0%a4%9d%e0%a5%80","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}