Skip to product information
1 of 2

Payal Books

Brahmeghotala By Junior Bramhe

Regular price Rs. 290.00
Regular price Sale price Rs. 290.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publication

या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे यात भरपूर फालतूपणा केलेला असतो . शब्दांचे खेळ , गद्य – पद्य विडंबनं , उगाचच केलेल्या कोट्या असतात . काहीवेळा तर कोट्या ‘ करायच्या म्हणून ओढूनताणून केलेल्या असतात . हे सारं करत असताना लेखक आपल्याकडे पाहून डोळा मारून जणू आपल्याला म्हणत असतो , ” बघा मी कसा फालतूपणा केलाय . हा खरा बावळटपणा नसतो . हे लक्षात येण्यासाठी वाचकही तसाच ‘ चतुर ‘ हवा . तसा नसेल तर त्याची चिडचिड होईल . ‘ हा काय आचरटपणा आहे ? ‘ असं तो डोक्यावरचे केस उपटत विचारील अशा विनोदी लेखनाच्या वाट्याला हा वाचक आला तर लेखकानं काशीत जाऊन प्रायश्चित्त घ्यावं.तेव्हा एक सावधगिरीची सूचना अर्थात वैधानिक इशारा : तुम्ही दुसऱ्या प्रकारातले म्हणजे ‘ असली ‘ वाचक असाल तर आणि तरच या पुस्तकाच्या वाट्याला जा . पहिल्या प्रकारचे वाचक असाल तर त्यांना टोकाचे आत्मक्लेश सोसावे लागतील त्या क्लेशांतून आनुषंगिक मेंदूविषयक आजार उद्भवले तर त्यांना लेखक – प्रकाशक – मुद्रक जबाबदार असणार नाहीत.