PAYAL BOOKS
Bomb Spot ; Bramhanvadi Doshi ,Muslimana Fashi by S. M. Mushrif
Couldn't load pickup availability
Bomb Spot ; Bramhanvadi Doshi ,Muslimana Fashi by S. M. Mushrif
हू किल्ड करकरे?' आणि '२६/११ प्रोब : व्हाय जुडिशिअरी अल्सो फेल्ड' या बहुचर्चित पुस्तकांचे लेखक माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांचे हे नवीन खळबळजनक पुस्तक होय. देशभरात झालेल्या बॉम्बस्फोट कटाच्यामागे ब्राह्मण्यावाद्यांचा असलेला हात आणि त्याचा आरोप निरपराध मुस्लिमांवर टाकणे. हा ब्राह्मण्यवाद्यांचा कट... असा या पुस्तकाचा विषय आहे. न्यायालयात नोंदवलेल्या आरोपपत्रांतील एक एका शब्दाची छाननी व न्यायालयाने सुनावलेले महत्त्वाचे निकाल आणि त्या महत्त्वाच्या कालखंडातील दैनिक वृत्तपत्रांतील कात्रणांचा गठ्ठा चाळल्यानंतर लेखक या निष्कर्षापर्यंत पोहचले आहेत की, बहूतेक बॉम्बस्फोट हे २००२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभिनव भारत, बजरंग दल, जय वंदे मातरम, सनातन संस्था इत्यादी ब्राह्मण्यवादी विचारसरणीच्या संघटनांच्या कटाचा भाग होते. पण ब्राह्मण्यवादी घटकांच्या सक्रीय पाठिंब्याने राज्यातील गुप्तचर संघटना (IB), राष्ट्रीय अन्वेषण अभिसरण संस्था (NIA) आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांनी जाणीवपूर्वक ब्राह्मण्यवाद्यांना गोत्यात आणणारे महत्त्वाचे धागेदोरे लपवले आणि मुस्लिमांवर प्रसार माध्यमांच्या मदतीने सर्व खापर फोडले. काही खटल्यांमध्ये तर न्यायालय एकतर प्रसार माध्यमांच्या प्रचारतंत्राला बळी तरी पडले गेले किंवा सरकारी पक्षाकडून त्यांची दिशाभूल तरी केली गेली. जर न्यायपालिकेने या सर्व खटल्यांचे न्यायिक पुनर्विलोकन केले व त्यातील शंकास्पद वाटणाऱ्या खटल्यांचा स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे पुनर्तपास केला तर या खटल्यांमध्ये ब्राह्मण्यवाद्यांचाच सहभाग असल्याचे उघडकीस येईल, अगदी ज्या खटल्यांमध्ये मुस्लिमांना आधीच दोषी ठरवून शिक्षा सुनावली गेली त्यामध्ये सुद्धा

