‘माझ्या तत्काळ निर्णयावर विश्वास ठेवा!
हे पुस्तक घ्या : तुम्ही आनंदित व्हाल’.
– द न्यूयॉर्क टाइम्स
हे पुस्तक सगळ्या अशा क्षणांबद्दल आहे ज्याक्षणी आपल्याला काहीतरी कळते; पण ते का कळाले हे कळत नाही. जगातील अत्यंत अभिजात विचारवंतांपैकी एक विचारवंत असलेले माल्कम ग्लॅडवेल या पुस्तकात अशा ‘ब्लिंक’ घटनांचा शोध घेतात की, ज्या हे दाखवून देतात की, सावधगिरीपूर्वक घेतलेल्या निर्णयापेक्षा क्षणार्धात घेतलेले निर्णय कसे अधिक परिणामकारक असतात. ते स्पष्ट करून देतात की, तुमच्या अंतःस्फुरणेवर विश्वास ठेवून तुम्ही विचारप्रक्रियेस पुन्हा पहिल्यासारखा विचार कधीच करणार नाहीत.
‘लक्षवेधक, खोडकरपणे हुशार’ – इव्हिनिंग स्टैंडर्ड
‘केवळ प्रेमाच्याच नव्हे तर व्यवसायाबाबतही खूप उपयुक्त’ – ऑब्झर्व्हर
‘हे अद्भुत पुस्तक सक्तीने वाचायला हवे’ – न्यू स्टेट्समन
‘ब्लिंक तुमचे जीवन बदलू शकते’ – एस्कवायर
‘हे पुस्तक तुम्ही विकत घ्यावे का’ ? उत्तर तुम्हाला आधीच माहीत आहे’ – इंडिपेण्डन्ट ऑन सण्डे
मज्जातंतुशास्त्र आणि मानसशास्त्राची काही तीक्ष्ण तथ्ये हे दाखवून देतात की, आपण किती मोठ्या प्रमाणातील माहितीचे पृथक्करण करतो याच्याशी चांगला किंवा वाईट निर्णय घेणे, या गोष्टीला काही देणेघेणे नाही. तर काही थोड्या तपशिलांवर आपले लक्ष एकाग्र करण्याच्या आपल्या क्षमतेशी ते निगडित असते. ग्लॅडवेल सांगतात की, या क्षमतेद्वारे आपण आपल्या घरात, कार्यालयात आणि दैनंदिन जीवनात अधिक चांगला निर्णयकर्ता बनू शकतो.